नियम व अटी
नोंदणी करण्यापूर्वी हे नियम काळजीपूर्वक वाचा. नोंदणी करताना 'मी नियम वाचले आहेत' या पर्यायावर खूण केल्याने तुम्ही हे सर्व नियम मान्य करता. आवृत्ती 2026-1
पात्रता
- वराचे किमान वय 21 वर्षे आणि वधूचे किमान वय 18 वर्षे (भारतीय कायद्यानुसार) पूर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार कायदेशीरदृष्ट्या विवाहास पात्र असावा. विवाहित व्यक्तीने नोंदणी करू नये.
- एका उमेदवारासाठी एकच खाते व एकच नोंदणी. बनावट किंवा दुहेरी नोंदणी आढळल्यास ती रद्द केली जाईल.
नोंदणी व खाते (युजर नेम)
- तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा युजर नेम आहे. एक मोबाईल नंबर एकाच खात्यासाठी वापरता येतो.
- सर्व माहिती (नाव, जन्मतारीख, शिक्षण, नोकरी, कुटुंब) खरी व अचूक भरावी. चुकीची माहिती दिल्यास नोंदणी रद्द होऊ शकते व शुल्क परत मिळणार नाही.
- पासवर्ड व सुरक्षा प्रश्नाचे उत्तर गुप्त ठेवा. ते इतर कोणालाही सांगू नका; कार्यालयाचे लोकही ते विचारत नाहीत.
- आम्ही SMS, WhatsApp, OTP किंवा ई-मेल संदेश पाठवत नाही. तुमची स्थिती, पावती, प्रवेश पास व वेळ फक्त या संकेतस्थळावरील 'माझे खाते' मध्ये दिसतात - ते वेळोवेळी पाहा.
- पासवर्ड विसरल्यास मोबाईल नंबर, जन्मतारीख व नोंदणीच्या वेळी ठरवलेल्या सुरक्षा प्रश्नाचे उत्तर वापरून नवीन पासवर्ड ठेवता येतो. ते जमले नाही तर कार्यालयात ओळख पटवून पासवर्ड रीसेट करता येतो.
नोंदणी शुल्क व पेमेंट
- नोंदणी शुल्क प्रत्येक उमेदवारासाठी ₹100 आहे. शुल्क भरल्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही.
- शुल्क फक्त या संकेतस्थळावर दाखवलेल्या अधिकृत UPI आयडी / QR / ऑनलाइन पेमेंटनेच भरा. इतर कोणत्याही खात्यात, व्यक्तीला किंवा फोनवर पैसे पाठवू नका.
- UPI ने पैसे भरल्यावर १२ अंकी UTR / व्यवहार क्रमांक अचूक टाका व पावतीचे छायाचित्र जोडा. कार्यालय तो तपासून मंजूर करते; मंजुरीनंतरच अधिकृत पावती व प्रवेश पास मिळतो.
- रोख शुल्क फक्त कार्यालयातील नोंदणी कक्षावर, अधिकृत पावतीच्या बदल्यातच स्वीकारले जाते.
परतावा व रद्दीकरण
- नोंदणी शुल्क साधारणपणे परत मिळत नाही.
- दुहेरी किंवा जास्त रक्कम भरली गेली असल्यास, चुकून मंजूर झाल्यास किंवा आयोजकांनी कार्यक्रम रद्द केल्यास परतावा दिला जातो.
- परताव्यासाठी कार्यालयाशी संपर्क करा (7391099301 / karmaveer.marriage@gmail.com). मंजूर परतावा ज्या मार्गाने पैसे आले त्याच मार्गाने केला जातो.
प्रोफाइल, पडताळणी व फोटो
- कार्यालय वय, ओळख किंवा इतर माहितीची कागदपत्रे मागू शकते. पडताळलेल्या प्रोफाइलवर 'कार्यालयाने पडताळले' असा शिक्का दिसतो.
- अलीकडील, स्पष्ट, स्वतःचा एकट्याचा फोटो द्या. फिल्टर, गटाचे फोटो, दुसऱ्याचे फोटो किंवा अश्लील / आक्षेपार्ह फोटो चालणार नाहीत.
- प्रोफाइल बदलण्याची मुदत संपेपर्यंतच बदल करता येतात. मुदतीनंतर बदलासाठी कार्यालयाशी संपर्क करा.
गोपनीयता व माहितीचे संरक्षण
- तुमची माहिती फक्त विवाह जुळवणे व मेळावा आयोजन यासाठी वापरली जाते. ती विकली जात नाही व जाहिरातीसाठी दिली जात नाही.
- मंजूर झालेल्या इतर नोंदणीकृत उमेदवारांनाच तुमचे प्रोफाइल दिसते. तुम्ही फोटो लॉक करू शकता, प्रोफाइल लपवू शकता किंवा एखाद्याला ब्लॉक करू शकता.
- तुमच्या माहितीची दुरुस्ती किंवा हटवण्याची विनंती तुम्ही कार्यालयाकडे करू शकता. माहिती कायद्याने आवश्यक तेवढेच काळ ठेवली जाते (डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, २०२३ नुसार).
- इतरांची माहिती फक्त विवाहाच्या हेतूने वापरा. ती कॉपी करणे, स्क्रीनशॉट प्रसिद्ध करणे, व्यावसायिक वापर किंवा त्रास देणे सक्त मना आहे; तसे केल्यास कारवाई होईल.
- आक्षेपार्ह किंवा खोटे प्रोफाइल दिसल्यास 'तक्रार करा' वापरा; कार्यालय तपासून योग्य कारवाई करेल.
मेळाव्याचा दिवस: कोड, वेळ व प्रवेश
- मेळावा 13 Dec 2026 रोजी आहे. शुल्क मंजूर झाल्यावर तुम्हाला क्षेत्रानुसार कोड (उदा. IT - I-001) व तुमच्या विभागाची वेळ मिळते; ती 'माझे खाते', पावती व प्रवेश पासवर दिसते.
- तुमच्या विभागाच्या वेळेत उपस्थित राहा. वेळेत न आल्यास पुढील संधी आयोजकांच्या सोयीनुसार दिली जाईल.
- प्रवेशासाठी प्रवेश पासचा QR (प्रिंट किंवा मोबाईलवर) व मूळ फोटो ओळखपत्र सोबत आणा. पासवर छापलेल्या संख्येइतकेच सोबतचे लोक येऊ शकतात.
- प्रवेश पास दुसऱ्याला देऊ नका. एका पासवर एकदाच प्रवेश मिळतो.
कार्यक्रमातील वर्तन
- शिस्त, सभ्यता व स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करा. मद्य, तंबाखू व इतर नशेच्या पदार्थांना मनाई आहे.
- कोणाशीही गैरवर्तन, दबाव किंवा आर्थिक देवाणघेवाणीची मागणी करू नका. असे आढळल्यास तत्काळ बाहेर काढले जाईल.
- मौल्यवान वस्तू स्वतः सांभाळा; त्यांच्या हरवण्याची जबाबदारी आयोजकांवर नाही.
फसवणुकीपासून सावध राहा
- आयोजक कधीही फोनवर पासवर्ड, OTP, UPI PIN किंवा बँक तपशील मागत नाहीत. असा कोणी मागितल्यास देऊ नका व कार्यालयाला कळवा.
- लग्नाआधी वर/वधू व कुटुंबाची स्वतः खातरजमा करा. कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी आयोजक जबाबदार नाहीत.
आयोजकांची भूमिका व सामान्य अटी
- आयोजक फक्त भेटीसाठी व माहितीसाठी व्यासपीठ देतात. विवाह जुळण्याची, माहितीच्या अचूकतेची किंवा कोणत्याही निकालाची हमी देत नाहीत.
- तारखा, वेळा व नियम आयोजक बदलू शकतात; बदल या संकेतस्थळावर जाहीर केले जातील. नोंदणी चालू ठेवणे म्हणजे बदललेल्या नियमांना संमती.
- आयोजकांचा निर्णय अंतिम राहील. वाद भारतीय कायद्यानुसार सोडवले जातील.
- संपर्क: 7391099301 / karmaveer.marriage@gmail.com